Admission Portal : RTE 25% Reservation For Academic Year: 2023-2024
English| मराठी
RTE Home Page
सन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :
१)
शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
२)
RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
३)
पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :- a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment
Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
४)
प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन
प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत
आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
५)
विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
६)
पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
७)
तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
सन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ.सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन
RTE कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षण आणि मोफत प्रवेश. महाराष्ट्र समावेशित शिक्षण
व्यावसायिक संघ द्वारा आयोजित : Click Here.
मार्गदर्शक
मा. श्री दिनकर टेमकर
(संचालक)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे.